'सेक्स'साठीच महिलांशी मैत्री करतात बहुतांश पुरुष!
नातेसंबंध आणि शारीरिक संबंधांबाबत बाबत महिला आणि पुरुषांमध्ये कमालीची मतभिन्नता आढळते, असे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याचे मनोविकार तज्ज्ञांनी सांगितले. महिला ज्या व्यक्तीवर प्रेम करतात, त्यांच्याशच शारीरिक संबंध प्रस्तापित करतात. परंतु, पुरुष महिलांपेक्षा अगदी भिन्न विचार करतात. तात्पुरता सेक्स अथवा क्षणीक सुख उपभोगण्याकडे पुरुषांचा जास्त कल असतो, असेही मनोविकार तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बहुतांश पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात, असा दावा मनोविकार तज्ज्ञांनी केला आहे. जर एखाद्या तरुणीकडे पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची चूक करू नका, असा जणू इशाराच तज्ज्ञांनी तरुणींना दिला आहे. याबाबतील पुरुष महिलांपेक्षा जास्त चतुर असतात. त्यांना कोणत्याही नातेसंबंधांच्या जाळ्यात अडकायला आवडत नाही. पुरुषांना नेहमी महिलांवर पुरुषार्थ गाजवण्यातच रस असतो. त्यामुळेच ते महिलांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. बहुतेक पुरुष पहिल्या भेटीतच महिलासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा तयारीत असतात.
महिला मात्र पुरुषांपेक्षा वेगळा विचार करतात. महिला कोणत्याही पुरुषांशी मैत्री करणे तर दूरच परंतु संवाद साधतानाही कचरतात. एखाद्या पुरुषाबाबत त्यांना सुरक्षितता वाटत असेल, अशाच पुरुषांच्या मैत्रीचा प्रस्ताव त्या स्विकारत असतात. महिलांच्या दृष्टीने जर एखादा पुरुष तिला समजून घेणारा असेल, परोपकारी प्रवृत्तीचा असेल तर अशा पुरुषांसोबत 'सेक्स' करण्याबाबत महिला विचार करतात.
मनोविकार तज्ज्ञ कॅरोलिन ब्रेडशॉ यांनी महाविद्यालयातील 71 तरुण- तरुणींवर संशोधन केले. शारीरिक संबंधांसाठी नाते हेच महत्त्वाचे असल्याचे 41 टक्के तरुणींनी मान्य केले तर केवळ 20 टक्के तरुणींनी डेटिंगला महत्त्व दिले. क्षणीक सुख उपभोगण्याकडे पुरुषांचा जास्त कल असतो, असे बहुतेक तरुणांनी मान्य केले. नातेसंबंधांच्या बंधनात अडकून पडण्याची पुरुषांची मुळीच इच्छा नसते.
याचा अर्थ असा की, महिलांचा सेक्स करण्यापूर्वी पुरुषांशी नातेसंबंध प्रस्तापित करण्याकडे कल असतो. परंतु, महिला ज्या गोष्टीचा विचार करतात त्याचे पुरुषांना काही घेणेदेणे नसते.
Post a Comment